“तालुकास्तरीय संविधान परिक्षेत भारत ,प्राजक्ता व फूले शाळाना पुरस्कार

 

तालुका प्रतिनिधी:-अमान कुरेशी
8275553131

सिंदेवाही – बामसेफ ,बहुजन विध्यार्थी संघटना व बहुजन समाज पार्टी तालुका सिंदेवाहीचे वतीने संविधान दिनाच्या राष्टीय पर्वावर आयोजित तालुकास्तरीय संविधान प्रश्न-मंजुषा परिक्षेत भारत विद्यालय नवरगाव ,प्राजक्ता विद्यामंदीर सिंदेवाही व महात्मा फूले विद्यालय सिंदेवाही अनुक्रमे प्रथम,द्वितीय व त्रूतिय पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत .

या तालुकास्तरीय परिक्षेत बहुपर्यायी व वस्ठुनिष्ठ प्रश्न विचारण्यात आले होते .सिंदेवाही तालुक्यातील इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विध्यार्थीसाठी ही परीक्षा करोना पार्श्वभूमीवर ऑनलाईन घेण्यात आली होती .
सदर परिक्षेत प्रथम पुरस्काराचा मान भारत विद्यालय नवरगाव येथिल् दहावीचा विद्यार्थी संघर्ष चंद्रप्रकाश चहान्दे यानी पट्काविला आहे .तर द्वितीय पुरस्कार प्राजक्ता विद्यामंदिर सिंदेवाहीच्या इयत्ता नववी च्या तेजस भूपेश पिसे यांनी प्राप्त केला आहे .आणि त्रूतिय बक्षीस महात्मा फूले विद्यालय सिंदेवाहीच्या इयत्ता दहावीचा विध्यार्थी वनश्री प्रभू रंध्ये यांनी मिळविला आहे .

या सर्व विजेत्या स्पर्धक विध्यार्थीना बामसेफचे तालुका संयोजक शिलपाल ताम्बागडे ,सह-संयोजक शैलेंद्र खण्डाले व युवा सामाजिक ब्रिगेड नवरगावचे अध्यक्ष अमोल निनावे यांचे हस्ते लवकरच एका कार्यक्रमात पुरस्कार व प्रशस्तिपत्र आयोजकांकडून प्रदान करण्यात येणार आहे ,अस कार्यक्रम संयोजक शिक्षणतज्ञ प्रा.भारत मेश्राम सिंदेवाही यांनी कळविले आहे,