वणीच्या बिट जमादारावर पांढरकवडा येथे लोखंडी रॉड ने हल्ला

 

वणी : विशाल ठोंबरे

वणी पोलीस ठाण्याचे बिट जमादार विठ्ल बर्रेवार यांच्यावर रविवारी सकाळच्या सुमारास पांढरकवडा शहरातील अन्नपूर्णा रेस्टारंट जवळ तीन इसमांनी लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून, त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
वणी शहरातील दिपक चोपाटी बीटचे जमादार विठ्ठल बर्रेवार हे काही कामानिमित्य पांढरकवडा येथे गेले होते.
त्यांनी काही दिवसापूर्वी किन्ही येथील जाकीर सैयद याला अटक केली होती. याचा वचपा काढण्याकरिता जाकीर ने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने रविवारी सकाळी 11 वाजताचे सुमारास बस्थानक जवळील अन्नपूर्णा हॉटेल जवळ जमादार विठ्ठल बुरेवार व त्यांचे नातेवाईक अशोक समृतवर या दोघांवर लोखण्डी रॉडने हल्ला केला.
या हल्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. या घटनेची तक्रार विठ्ठल बर्रेवार यांचा भाचा सुभाष समृतवर याने पांढरकवडा पोलिसात दिली. या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी सैयद जाकीर व त्याचे दोन साथीदाराविरुद्ध कलम 326,34 भादंवि नुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे.