इंदाराम येथे हनुमान मंदिरात काकड आरती व तुळशी विवाह कार्यक्रम उत्साहात संपन्न गुरुमाऊली भजन मंडळाचे पुढाकार

 

रमेश बामनकर/ग्रामीण तालुका प्रतिनिधी अहेरी

अहेरी :- अहेरी तालुक्यातील इंदाराम येथील हनुमान मंदिरात काकड आरती व तुळशी विवाह सोहळा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे.
सर्वप्रथम हनुमान जी चे पूजा- अर्चा करून विठ्ठल-रखुमाई च्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करून अक्षता वाहून तुळशी विवाह सोहळा साजरा करण्यात आले आहे तसेच गुरुमाऊली भजन मंडळाच्या वतीने भजन करून देव-देवतांच्या नामस्मरण,स्तुती केले आणि विठ्ठल-रखुमाई प्रतिमेचा सजावट करून गावात ढोल-ताशांच्या वाजा-गाजाणे दिंडी काढण्यात आली आहे.आणि संपूर्ण गावाला महाप्रसाद वितरण करण्यात आले आहे.
कार्यक्रम यशस्वी करिता गुरुमाऊली भजन मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास कोत्तावडलावार,उपाध्यक्ष वसंत मेश्राम,सचिव साईनाथ गोमासे, माजी सचिव पदमनाभम कविराजवार मार्गदर्शक शंकर चाकणारपवार,सुरेश कोत्तावडालावार,सर्व सदस्य किशोर तेलंगे,अविश दुर्गे पेटीमास्तर, विनोद औतकर,गणेश पोगुलवार,श्रीनिवास रेपकवार,मिथुन दुर्गे,सत्यनारायण रादंडीवार,विलास आत्राम,रोशन सामलवार,सुरेश कोसरे, बालचंद्र मेश्राम,विवेक औतकर,विश्वजित मेश्राम,दौलत मेश्राम,कोटेश्वर कोत्तावडालावार,छगन आत्राम, रोहित कोत्तावडलावार आशिष औतकर,शुभम औतकर,अक्षय बतुलवार, कार्तिक अनमोलवार,फकिरा पेंदाम, शरद आलाम तसेच गावातील महिला-पुरुष,युवक-युवती उपस्थित होते.