कोराडी काँलनीतील त्या २७ वर्षिय कोरोनाबाधित तरुणीच्या संपर्कातील ४ जण पाँजिटीव? कोराडी काँलनी कोरोना संक्रमणाची साखळी वाढण्याची दाट शक्यता

0
3706

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कोराडी /नागपुर: २१ जुलै २०२०
दि. १९ जुलै २०२० रोजी विद्युत विहार कोराडी काँलनी वसाहती तील E Type 110 या बिल्डिंग मध्ये राहणारी २७ वर्षिय तरुणी कोरोना पाँजिटीव निघाली होती. तिच्या थेट संपर्कात आलेल्या तिची आई(५२वर्ष),
तिची बहिण(३०वर्ष), तिच्या बहिणीचा मुलगा(११वर्ष) व एक मुलगी (२वर्ष)अशा ४ जणांना,  तहसीलदार व वैद्यकीय अधिकारी गुमथी यांनी VNIT नागपुर ला कोरोंटाईन केले होते!
आज या ४ ही जणांचे रिपोर्ट पाँजिटीव आल्याचे समजते. त्यामुळे आता या परिवाराशी निगडित त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी जे त्यांच्या संपर्कात होते, त्यांनी आपापल्या कोव्हीड १९ ची टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथी,वर कोरोना चे संकट

प्राप्त माहितीनुसार गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रात आजुबाजुच्या सर्कल चे जि. प. सदस्य, पं. स. सदस्य आणि वैद्यकीय टीम यांची १९ जुलै पूर्वी बैठक झालेली होती आणि या बैठकीत जवळपास २५-३० व्यक्ती उपस्थित होते. या प्राथमिक आरोग्य केंद्रात अटेंडेंट म्हणुन कार्यरत महिला सेविका ५२ वर्षिय ह्या पण उपस्थित होत्या. आणि या मिटिंग च्या एक दिवसानंतर त्यांची २७ वर्षिय मुलगी कोरोना पाँजिटीव निघाली होती.खरे पाहता गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्राला शासकीय नियमानुसार सील करायला पाहिजे होते कारण तेथील अटेंडेंट पाँजिटीव निघाली होती. परंतु अद्यापही ते सील केले नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परिसरातील सुज्ञ नागरिकांनी हे प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथी सील करुन नागपूर हुन दुसरी वैद्यकीय टीम महादुला कोराडी सर्कल मध्ये पाठविण्याची मागणी केली आहे.
मात्र आज ही मिटिंग झाल्यानंतर आज ४ दिवसांनी २१ जुलै रोजी गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अटेंडेंट (५२वर्ष) आज पाँजिटीव निघाल्याचे व्रृत्त आज संपूर्ण महादुला-कोराडी, गुमथी, गोधनी, बाभुळखेडा. वारेगाव, म्हसाळा, टोली या गावात वाऱ्याच्या वेगाने पसरल्याने मुळे येथील जनप्रतिनिधी जे गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रातील मिटिंग मध्ये उपस्थित होते, ते धास्तावलेले आहेत.
२७ वर्षिय तरुणीच्या संपर्कातील कोरोना संक्रमणाची साखळी एवढी मोठी आहे की आजुबाजुच्या गावात कोरोना संकरमणाचे लोण पसरण्याची दाट शक्यता आहे. काल या तरुणीच्या बहिणी ने, भाटव्याने आपली टेस्ट केली असुन उद्या त्यांचा रिपोर्ट येईल. आणि आता सर्वांची नजर या दोघांच्या टेस्ट कडे लागली आहे. सर्व जण आशा करीत आहेत की या दोघांच्या टेस्ट निगेटिव्ह याव्यात. आणि कुठेतरी कोरोना ची ही साखळी तुटावी….