अडीच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी आज पाथरी कडकडीत बंद.

165

 

मंगेश सहारे
ग्रामीण प्रतिनिधी
दखल न्युज भारत सावली
मो.9921057753

सावली – तालुक्यातील पाथरी येथे एका बहुजन समाजात असलेल्या कुटुंबातील अडीच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना (दि. 17) रोजी घडली असून आजच्या सुसंस्कृत समाजातील महाराष्ट्रामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे . या घटनेतील सदर आरोपी जितेंद्र रामदास मेश्राम (वय 45 वर्ष) याला अटक करण्यात आली असून या घटनेचा तीव्र निषेध दर्शवत पाथरी येथील मादगी समाज संघटनेने व्यापारी वर्गाला एकमताने निर्णय घेत संपूर्ण मार्केट कडकडीत बंद ठेवले आहे. त्यामुळे आज दिनांक 21 रोजी पाथरी कडकडीत बंद ठेवण्यात आले .
या संदर्भात तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री,जिल्हाधिकारी यांना निवेदन मादगी समाज संघटना यांनी न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने व्हावी व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले असून यामध्ये मा. स. ता. संघटक रुपचंद लाटेलवार, रमेश लाटेलवार, नितीन गोरडवार,गंगाधर कोरेवार, अविनाश पेंडलवार,सरपंच राजेश सिद्धम, प्रहार सेवक प्रफुल तुम्मे,प्रहार सेवक,उमाजी भैसारे,कमलेश वानखेडे,अनिल मडावी, आकाश आलेवर, आदी मादगी समाज गावकरी उपस्थित होते.