माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेबांच्या 57व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाटोदा तालुक्यातील चिखली(नाथ) या गावी 57 वृक्षांची लागवड करण्यात आली

150

मुंबई : वाढदिवस म्हटले की आपल्या आठवणीतला दिवस या दिवशी अनेक इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत असा सर्व मित्र परिवाराच्या आशिर्वाद पाठीमागे असतो. नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी कार्यकर्ते बॅनर, पोस्टर लावतात.
फटाके, हार तुरे यात मोठ्या प्रमाणात व्यर्थ खर्च होतो परंतु
नेत्यावर असं ही प्रेम दिसून आले ते पुढारी वस्त्र भांडार मंत्रालय मुंबईचे मालक आलम पुढारी यांच्या वतीने माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या 57व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाटोदा तालुक्यातील चिखली(नाथ) या गावी 57 वृक्षांची लागवड करण्यात आली.
ते सर्व 57 झाडं हे वाढवण्याची जबाबदारी आलम पुढारी यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांनी घेतली आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते जयदत्त भैय्या धस व जिल्हा परिषद सदस्य माऊली आप्पा जरांगे यांची उपस्थिती लाभली.