गरजु लोकांना पोलिस विभागा तफै कपडे वाटप.. उपविभागीय पुलिस अधिकारी जालींदर नालकुल यांचा अभिनव उपक्रम..

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी दखल न्यूज भारत..।।
गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक. मंगेश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जालींदर नालकुल, उपविभागीय पोलीस अधिकरी आमगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सालेकसा अंतर्गत न्यु बेस कॅम्प मुरकुटडोह तसेच मैत्री परिवार नागपुर यांचे तर्फे मुरकुटडोह क्र. 1,2,3 व दंडारी, कट्टीपार, टेकाटोला या गावातील गरजु व्यक्तिंसांठी कपडे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात सुमारे 40 लहान मुले व मुली यांना कपडे वाटप करण्यात आले तसेच 15 गरजु पुरूष तसेच विधवा व असहाय महिलांना शर्ट व साडयांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम दरम्यान एकुण 100 इसमांना कोरोना विषाणुचे संसर्गाचे पार्ष्वभुमीवर 3 लेयर मास्क चे वाटप करण्यात आले व घ्यावयाची काळजी या संबंधी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रम आयोजनाच्या दरम्यान समीर मानकर, मैत्री परिवार नागपुर तसेच मुरकुटडोह बेस कॅम्पचे वतीने सपोनि अभिजीत भुजबळ, छत्तीसगढ पोलीस चे पोलीस उप निरीक्षक श्री. दिलीप पटेल, मध्य प्रदेश पोलीस उपनिरीक्षक, जादोन, भुपतसिंग गौड व मुरकुटडोह चे पोलीस उपनिरीक्षक पवार, खामगळ व मुरकुटडोह येथील स्टॉफ हजर होता. सदर कार्यक्रमाचे वेळेस नागरिकांनी समाधान व्यक्त केले असुन अषा कार्यक्रमांचे आयोजन करण्यामुळे जनतेमध्ये पोलीस प्रशासन तसेच शासन व्यवस्थेविषयी विश्वास वाढुन नक्षलग्रस्त भागातील जनता ही नक्षल चळवळीपासुन दुर होण्यास मदत होईल…