सी.आर.पी एफ.191 तर्फे वृक्षारोपण

190

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

देसाईगंज- सी.आर.पी.एफ.191 बटालियन च्या वतीने देसाईगंज शहर तथा परिसरात विविध प्रजातीच्या 2000 वृक्षांची लागवड करण्यात आली.दिनांक 19 जुलै 2020 रोज रविवार ला लाटाई माता मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी सी आर.पी एफ.191 बटालियन चे कमांडर प्रभाकर त्रिपाठी, सौ. पूनम प्रभाकर त्रिपाठी , द्वितीय कमांडर डॉ.सत्यविर सिंग वर्मा, संजय मारवान, इन्स्पेक्टर राकेश सक्सेना, व देसाईगंज शहरातील विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. देसाईगंज शहरातील विविध शाळेतील लहान मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांनीच वृक्षांची जोपासना व संवर्धन असे मत प्रभाकर त्रिपाठी यांनी व्यक्त केले .