वीजबिल वाढीच्या तक्रारीबाबत आमदार डॉ. राजन साळवी यांची महावितरणवर धडक

149

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

राजापूर: एकीकडे कोरोनाच्या संकट असतानाच महावितरणाची वाढीव बीले आल्यामुळे सामान्य नागरिकांच्या अनेक तक्रारी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजनसाळवी ह्यांना प्राप्त झाल्यामुळे महावितरण कार्यालय, पॉवर हाऊस रत्नागिरी येथे धडक मारली. लांजा महावितरण कार्यालय येथे महावितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता श्री. वैभव सावंत यांचेकडे महावितरण च्या अनेक प्रश्नांबात आढावा घेतला असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनच्या काळात महावितरणाचे तीन ते चार महिन्यांची बिले एकदम भरमसाठ आली असल्यामुळे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.राजनजी साळवी यांनी महावितरण अधीक्षक अभियंता श्री. देवेंद्र सायनेकर तसेच कार्यकारी अभियंता श्री. पळसुलेदेसाई यांची भेट घेऊन या समस्याबाबत जाब विचारला. त्यावेळी अनेक तक्रारदार उपस्थित होते. त्यावेळी महावितरण अधीक्षक अभियंता श्री.सायनेकर यांनी त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊन आलेली लाईट बिल महिन्याची करून देण्याबाबत मंजूर केले तसेच ज्यांना सदरचे बिल एक रक्कमी भरणे शक्य असेल त्याने त्याबाबत सूट देण्यात येईल तसेच तोपर्यंत कोणती वीज तोडणीची कार्यवाही करण्यात येणार नसल्याचे मान्य केले. त्याप्रसंगी तालुकाप्रमुख संदीप दळवी, सभापती लीलाताई घडशी, नगराध्यक्ष मनोहर बाईत, पाणी सभापती राजू हळदणकर वीज ग्राहक उपस्थित होते.

दखल न्यूज भारत