रत्नागिरी जिल्हातील खेड ता.कावळे देवकोंड वाडी ते कासई काजू फाटा या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत जिल्ह्यातील अनेक भागात लोक आजही रस्त्याच्या प्रतीक्षेत.

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

रत्नागिरी :- जिल्हातील खेड ता.कावळे देवकोंड वाडी ते कासई काजू फाटा या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे यासाठी शासनाने २८ लाख निधी खर्च करुन ओढ्यावरील पुलाचे काम करुन ,रस्त्याचे काम माञ अपूर्ण ठेवले आहे.
रस्ता नसल्यामुळे येथील ग्रामस्थांचे हाल होत आहेत, कोणतेही वाहन गावात जाऊ शकत नाही. त्यामुळे लोक नाराजी व्यक्त करीत आहेत.
चाकरमाणी गणपतीच्या सणाला आले तरी ओढ्याच्या पलीकडे कासई गावात गाड्या पार्किंग करुन कावळे देवकोंड जावे लागते, रस्ता कधी तयार करणार? गावामधील एखादी व्यक्ती आजारी पडल्यावर डोली तयार करुन बांधुन मुख्य रस्त्यावर नेण्याची ग्रामस्थांवर वेळ येते अनेकदा रुग्णांचे हाल होतात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे कठीण जाते. हा वनवास गेल्या २५ वर्ष आम्ही भोगतोय, याचा शासनाने विचार करून आम्हा कावळे देवकोंड वाडीतील ग्रामस्थांचा प्रश्न सोडून द्यावा हि विनंती शासनाला ज्ञानेश्वर खांबे व दत्ताराम खांबे कुणबी समाज पिंपरी चिंचवड अध्यक्ष व इतर ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनी याबाबत योग्य दखल घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

दखल न्यूज भारत