चिमूर तालुक्यात मुरूमाचे प्रचंड प्रमाणात अवैध उत्खनन..कुणाचे हात ओले? – नितीन मत्ते जिल्हा खनिज सदस्य व शिवसेना जिल्हा प्रमुख.. –उपविभागीय अधिकारी,तहसीलदार चिमूर यांना निवेदन सादर..

173

उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर तालुकातंर्गत मोठ्या प्रमानात अवैध रित्या वाळू व मुरूमाचे होणारे उत्खनन गंभीर बाब असून,अशा पध्दतीने अवैधरित्या होणारे मुरुम व वाळूचे उत्खनन,शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविण्यास कारणीभूत ठरतो आहे.म्हणूनच वाळू व मुरुमाचे होणारे अवैधरित्या उत्खनन थांबविण्यात यावे यासाठी,चंद्रपूर जिल्हा शिवसेना प्रमुख व जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य,नितीन मत्ते यांच्या नेतृत्वाखाली चिमूर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदने देण्यात आली.यावेळी धरमसिंह वर्मा व केवलसिंग जुनी उपस्थित होते.

तालुक्यातील अवैध रेतीची व मुरूमाची चोरी थांबविण्यात आली नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही ईशारा यावेळी नितीन मते यांनी उपविभागीय अधिकारी संकपाळ व तहसीलदार संजय नागटिळक यांना दिला.
निवेदन देताना नितीन मत्ते जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य तथा जिल्हा प्रमुख शिवसेना,धरमसिंह वर्मा मा. उपजिल्हा प्रमुख,केवलसिंग जुनी उपतालूका प्रमुख,मनोज तिजारे उपतालुका प्रमुख,विजय गोठे उपशहर प्रमुख,श्रीहरी सातपुते विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख,कृष्णकुमार टोंगे विभाग प्रमुख,सुधाकर निवटे जेष्ट शिवसैनिक,विशाल बोकडे उप शहर प्रमुख हे उपस्थित होते.