कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांनचा मार्ग मोकळा : पालकमंत्री अनिल परब

149

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

मुंबई – कोकणातील महत्वाचा असा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चाकरमान्यांना कोकणात जाण्यास आता परवानगी देण्यात आली आहे.कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना नियमांचे पालन करून एसटीने आपल्या गावी जाता येणार आहे.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणातील आपल्या गावी जाण्याची ओढ कोकणी माणसाला लागली आहे. मात्र ग्रामिण भागात सध्या कोरोनाचा सुरू असणारा प्रदुर्भाव पाहता हा कोरोना अटोक्यात आला नसला तरी काही नियमांचे पालन करून कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी एसटीने आपल्या गावी जाता येणार आहे. अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.त्यामुळे गणेशोत्सवाच्या पूर्वी राज्यातील ठाकरे सरकारने चाकरमान्यांना मोठा दिलासा दिला आहे. कोकणात गणेशोत्सवाच्या काळात गर्दी होणार नाही,याची काळजी घ्यावी लागणार असल्याचेही परब यांनी सांगितले.

दखल न्यूज भारत