जिल्हा परिषद गडचिरोली येथे नव्याने रुजू झालेले सीईओ यांचे आ. कृष्णाजी गजबे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

0
328

 

दिनेश बनकर/पंकज चहांदे
दखल न्यूज भारत

गडचिरोली- गडचिरोली येथील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या स्थानांतरानंतर सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी इंदुराणी जाखड यांच्याकडे प्रभारी सीईओ म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता त्यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून बदली करण्यात आली. त्यामुळे येथील मुख्य कार्यकारी अधिकारपदी कुमार आशीर्वाद हे रुजू झाले आहेत. त्यांनी सीईओ पदाचा पदभार स्वीकारताच आ. कृष्णा गजबे आरमोरी विधानसभा क्षेत्र, आरमोरी पंचायत समितीच्या सभापती सौ निताताई ढोरे, विवेक पाटील खेवले पं.स. सदस्य ,आरमोरी येथील भाजपा तालुकाध्यक्ष नंदुभाऊ पट्टेवार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. व नवनियुक्त सीईओ कुमार आशीर्वाद यांच्याशी गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.