Home नागपूर कन्हान पोलीस स्टेशनचा भंगार लिलाव थांबवा- श्री भिमटे(उपाध्यक्ष, नाः जी ग्रामिण राष्ट्रवादी...

कन्हान पोलीस स्टेशनचा भंगार लिलाव थांबवा- श्री भिमटे(उपाध्यक्ष, नाः जी ग्रामिण राष्ट्रवादी काग्रेस)

170

 

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रातीनिधी
दखल न्युज भारत ,नागपुर

कन्हान (ता प्र): – कोविड-१९ चे संक्रमण दिव सेंदिवस वाढत असून कन्हान क्षेत्रात २७ कोविड रुग्ण सापडले आहेत. अशा परि स्थितीत कन्हान पोलीस स्टेशन मधील भंगाराचा लिलाव २२ तारखेला होणार आहे. हि प्रक्रिया थांबविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व रिपब्लिकन भीमशक्तीचे प्रदेशाध्यक्ष श्रीचंद्रशेखर भिमटे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना एका निवेदनातून केली आहे. या लिलावा मध्ये रामटेक, नागपूर, कामठी, मौदा, कन्हान, पारशिवनी या भागातील कबाड्डी व्यापा री लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याची शक्यता आहे. कोणताही कार्यक्रम असला तर त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित रा हण्याची लोकांना परवानगी नाही आहे. लिलावाच्या वेळी कबाड्डी व्यवसायी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कोरोना संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. कन्हान पोलीस स्टेशन मधील असलेल्या भंगारा मुळे कोणालाही त्रास नाही व पोलीस स्टेशन समोर असल्याने चोरीला जाण्याची भीती नाही. अशा परिस्थितीत लिलाव करणे संयुक्तिक नाही. त्यामुळे २२ तारखेला भंगाराचा होणारा लिलाव थांबविण्यात यावा अशी मागणी श्री भिमटे यांनी केली आहे.

Previous articleमनरेगा, कृषी कामे सुरू करावी राजेंद्र चामट शिवसेना तालुकाप्रमुख तिरोडा शेतकरी, शेतमजूर, सामान्य जनता पाण्याविना बेजार
Next articleवारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करा :- राजू झोडे बल्लारपुर येथील विद्युत कंपनीचा भोंगळ कारभार