मनरेगा, कृषी कामे सुरू करावी राजेंद्र चामट शिवसेना तालुकाप्रमुख तिरोडा शेतकरी, शेतमजूर, सामान्य जनता पाण्याविना बेजार

112

 

अतित डोंगरे दखल न्यूज प्रतिनिधी

तिरोडा : मुंडीकोटा कृषी मंडळात जवळपास 32 गावांचा समावेश होतो. मुंडीकोटा मंडळ पाणी सिंचनाचे दृष्टीने अतिशय टेल वरील गावे आहेत. यात मुंडीकोटा, घोगरा, पाटीलटोला, घाटकूरोडा, नवेगाव खुर्द, येडमकोट, पांजरा, खोपडा, बायवाडा, केसलवाडा, सेलोटपार, खैरी, सोनेखारी, सीतेपार, खेडेपार, मुरपार नवेझरी, मुरमाडी, बोरगाव, लाखेगाव, बिरसी, खोडगाव, उमरी, धादरी सालेबर्डी, सोनोली, बिरोली या गावांचे धान पिकाला हंगामी पाण्याशिवाय पर्याय नाही. हंगामी शेतीची कामे पूर्णतः रखडली आहेत. शेतकऱ्यांचे डोळे गगणाशी भिडलेले आहेत. शेतकरी दमदार पावसाची वाट पाहत बसला असला तरी पाऊस रोजच हुलकावणी देत आहे. शेतातील प-हे सुकत चालली आहेत.

सध्या देशातच कोविड १९ प्रादुर्भाव आहे. सामान्य जनतेच्या हाताला काम नाही. देश विदेशातील, राज्यातील जनता स्वगृही परतली आहे. अश्या बिकट परीस्थितित शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवत आहे. हाताला काम नाही. हलाखीचे जीवन जगणे सुरू आहे. जनावऱ्यांचा चाऱ्यांचा प्रश्न भेडसावत आहे. पिण्याचे पाण्याकरिता वणवण होण्याची पाळी येणार आहे. अश्या बिकट वेळी मनरेगा व कृषी कामे सुरू केल्याखेरीज शेतकरी, शेतमजूर, सामान्य जनतेचा पर्याय नाही.

अश्या समई तातडीने जनहिताच्या दृष्टीने मनरेगा व कृषी कामे सुरू करण्यात यावी. अशी मागणी राजेंद्र चामट शिवसेना तिरोडा तालुकाप्रमुख यांनी केली आहे.