आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शेतकऱ्याच्या बांधावर वृक्ष रोपन…

108

देवानंद जांभूळकर
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने आप जिल्हा प्रमुख बाळकृष्ण सावसाकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन इंदिरानगर, गडचिरोली येथील पोलिस पाटील भाष्कर कोठारे यांच्या शेतातील बांधावर सिताफळ,पेरू, इत्यादी. फळ रोपट्याची लागवड करून वाढदिवस साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांना शेतात दुहेरी उत्पन्न घेवून आर्थिक सक्षमीकरण बळकट करून शेतकऱ्याचे मनोबल वाढविण्यात आले.व समस्या जाणुन घेण्यात आल्या.
त्यावेळी उपजिल्हा प्रमुख डॉ. देवेंद्र मुनघाटे,सचिव देवराव दुधबळे,कोषाध्यक्ष संजय जिवतोडे,तालुकाध्यक्ष सुधाकर बुरांडे,शहर प्रमुख अनिल बाळेकरमकर,प्रकाश शेंडे,हितेंद्र गेडाम, बाळू जगताप, रूमाजी भुरले आदि कार्यकर्ते उपस्थित होते.