खल्लार कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 95.16टक्के

268

दर्यापूर(तालुका प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
नुकताच अमरावती बोर्डाचा 12 विचा निकाल जाहीर झाला असून दर्यापूर तालुक्यातील खल्लार कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 95.16टक्के लागला आहे
खल्लार येथे एकूण 62 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 59 विद्यार्थी यश संपादित केले असून कनिष्ठ महाविद्यालयातून कु प्रतीक्षा किशोर माहुरे,, गौरव निळकंठ कडू हे प्राविण्य श्रेणीत प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले तर कु वैष्णवी श्रीकृष्ण पवार, कु नाफिया सरफराज पठाण, कु साक्षी सुनिल खंडारे, नेहा तायडे, विशाल छत्रपती मोहोड या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळविले
गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळा समिती सदस्य श्री मधुसुदनजी धाबे, प्राचार्य एम जे पातुरडे, कनिष्ठ महाविद्यालय प्रभारी प्राध्यापक एस पी घोगरे, प्रा एल एफ थोरात, प्रा दामले, शिक्षक श्री अनिल बगाडे,श्री अमोल मोपारी, पी ए म्हाला व्ही आय तायडे, प्रदीप घोगरे इत्यादींनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे
तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या यशाबद्दल शाळा समिती अध्यक्ष तथा शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कार्यकारिणी सदस्य प्राचार्य केशवरावजी रामकृष्ण गावंडे, शाळा समितीचे सदस्य श्री मधुसुदनजी धाबे, श्री एस जी मोपारी, शाळा निरीक्षक व्ही डब्ल्यू गावंडे यांनी कौतुक केले आहे