प्रसेनजीत डोंगरे
8275290099,
गोंडपिपरी. राजुरा तालुक्यातील मध्यचांदा वन विभागातील विरुर वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कविटपेठ गावातील तुळशीराम आत्राम यांचेवर शेतात वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज दुपारी चार वाजेदरम्यान घडली मागील काही महिन्यापासून वाघाचे हल्ल्यात 3 लोकांचा बळी गेला असून वन विभाग या वाघाला पकडण्यासाठी महिनाभरापासून प्रयत्न करूनही वाघाचा बंदोबस्त करू शकले नसल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे
शेतात दोरीने बांधून असलेली गाय दोर तोडून जंगलाचे दिशेने जात असल्याने तुळशीराम गायीचे दिशेने धावू लागला परंतु झुडपात दबा धरून असलेला वाघाने गाईला सोडून तुळशीरामवर हल्ला चढविला चागली हातघाई झाली दुसरा सोबतीने आरडाओरड केला त्यामुळे वाघाने त्याला सोडले संधी मिळताच तुळशीराम झाडावर चढला बऱ्याचवेळाणी दुसरा सोबती आला त्यामुळे कसाबसा त्यातून बचावला नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला असला तरी वाघाचे सतत हल्यामुळे शेतकरी भयभीत झाले असून शेतीचा हंगाम कसा करायचा अश्या चिंतेत आहेत