विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यांचा मृत्यू

प्रसेनजीत डोंगरे
तालुका प्रतिनिधी गोंडपिपरी,
8275290099,

गोंडपीपरी. तालुक्यातील शिवणी (देशपांडे) गावचा शेतकरी खुशाबराव ताजने (वय ४३) याचा आज (दि.२०) विजेच्या धक्क्याने घटनास्थळीच मृत्यू झाला.त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
पावसाने दमदार सुरूवात केल्यानंतर शेतकरी आपल्या कामाला लागला.आता सद्या धान रोवणीचा हंगाम चालला असताना
रोवनी दरम्यान रोपांना मुबलक पाणी पुरविणे आवश्यक असते.अशावेळी आपल्या शेतातील मोटारपंप सुरू करण्याच्या बेतात विजेवर चालणाऱ्या या पंपाला हाताचा स्पर्श होताच त्यावरील झाकलेल्या लोखंडी पत्र्याला शाक आला.दुपारला हलकासा पाऊस आल्यामुळे जमीन पूर्णतः ओली झाली होती.यादरम्यान अचानक त्याला विजेचा जबर धक्का बसल्याने खुशाबरावचा घटनास्थळीच मृत्यू झाला.खुशाबराव ताजने हा
कुटुंबातील प्रमुख होता.त्याच्या पश्चात मुलगा,मुलगी,पत्नी असा आप्तपरिवार आहे.या शेतकऱ्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सदर घटनेची माहिती पोलीसांना मिळताच गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.पुढील तपास त्यांच्या मार्फत सुरु आहे.