माजी खासदार मा प्रकाश जाधव व्दारे कन्हान पिपरीच्या २५ कुंटुबाना जिवनाश्यक वस्तु भेट

155

 

कमलसिंह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत ,नागपुर

कन्हान (ता प्र) : – कन्हान शहरात कोरोना विषाणु संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेत माजी खासदार मा. प्रकाशभाऊ जाधव हयानी पिपरीच्या होम क्वांटाईन कुंटुबाना गहु, तांदुळ, तेल, हळद, मिरची, मसाला व भाजीपाला या जिवनाश्यक वस्तुची किट नगरपरिषद कर्मचा-या हस्ते भेट दिली.
सोमवार (दि.२०) ला ढिवर मौहला पिपरी येथे पाच रूग्ण आढळल्याने दोन मौहले प्रतिबंधित करून २३ कुंटुबाना होमक्वांटाईन करण्यात आले असल्याने ही कुंटुब शेतीकाम व हातमजुरी करित असुन परिस्थिती हलाखीची असल्याने कन्हान रहिवासी, रामटेक लोकसभेचे माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव हयानी नगरपरिषद कर्मचा-याच्या हस्ते २३ कुंटुबाना व २ स्वच्छता कर्मचारी असे २५ कुंटुबाना गहु, तांदुळ, तेल, हळद, मिरची, मसाला व भाजीपाला या जिवना श्यक वस्तुची किट मदत म्हणुन भेट दिली. याप्रसंगी माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, दिलीपजी राईकवार, कमलेश पांजरे, ग्रामिण पत्रकार संघ अध्यक्ष मोतीराम रहाटे, सुनिल सरोदे, रविंद्र दुपारे,सतिश साळवी,संजय ठाकरे, सचिन साळवी, संजय हावरे, अशोक मेश्राम, निशांत जाधव, राधेश्याम भोंगाडे , शिव जाधव, आकाश चिखले, नगरपरिषदेचे आधिक्षक श्री सुशांत नरहर, पाणी स्वास्थ विभाग प्रमुख बिसने, संकेत टालेवार, सोमकुवर, रविंद धोटे सह पोलीस व स्वच्छता कर्मचारी आदी उपस्थित होते