गोशाळेला दान करून आगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस चिपळूणचे शिवसेना कार्यकर्ते शेखर लवेकर यांचा समाजात आदर्श निर्माण करणारा उपक्रम

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर.

चिपळूण शहरातील खेंड प्रभागातील शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते शेखर घनश्याम लवेकर यांनी रविवार दि.१९ जुलै रोजी.आपला ५१ वा वाढदिवस एक वेगळा संकल्प करून साजरा केला,लोटे येथील श्री संत ज्ञानेश्वरी माऊली मुक्तीधाम सेवा संस्थांच्या गो शाळेला पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करून गो मातेच्या संगोपनाचे एक चांगले कार्य करीत असलेल्या गो शाळेला हातभार लावला,
सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने हाहाकार माजविला असल्यामुळे
सर्वत्र मोठया प्रमाणत आर्थिक मंदी जाणवत आहे ,यात अनेक लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे, तर या आर्थिक महामारीपासून मुके प्राणीही वाचले नाहीत अशावेळी काही दानशूर व्यक्ती,सामाजिक संघटना मदतकार्यासाठी पुढे आल्या आहेत,काही महिन्यांपूर्वी चारा डेपो ला अचानक लागलेल्या आगीत श्री संत ज्ञानेश्वर माऊली मुक्तीधाम सेवा संस्थांनच्या गो शाळेचे मोठे नुकसान झाले होते , शिवाय येथील गुरांना अन्नाचाही मोठया प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता, या वेळी या गोशाळेचे पालनहार भगवान लोकरे महाराज यांनी समाजात दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या जनावरांना मदतकार्य करण्याचे आवाहन केले होते,या आवाहनाला साद देत सामाजिक कार्यकर्ते शेखर लवेकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक सामाजिक दायित्व म्हणून रविवारी गोशाळेला एक टन चारा, आणि गूळ असे मिळून एकूण पाच हजाराचे अर्थ सहाय्य केले,यावेळी त्यांच्यासोबत भगवान लोकरे महाराज,गौरव लवेकर,सौरव लवेकर ,
आदी उपस्थित होते, सध्या कोरोना परिस्थितीमुळे आर्थिक संकट तर आता काही महिन्यापूर्वी गोशाळेतील चारा डेपो आगीत जळून खाक झाल्याने गो मातेच्या
संगोपनासाठी आर्थिक जुळवाजुळव कशी करायची या विवंचनेत असतानाच गोमातेच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीत प्रशासनाचे गोशाळेला सहकार्य मिळणे अपेक्षित आहे, असे गोशाळेचे संचालक ह.भ.प.भगवान कोकरे यांनी या वेळी सांगितले,तसेच गोशाळेल सहकार्य करणारे शेखर लवेकर यांचे आभार मानले,वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षातील नेतेमंडळी,कार्यकर्ते,आणि मित्रपरिवार यांनी शेखर लवेकर यांना शुभेच्छा दिल्या,

*दखल न्यूज भारत*