Home महाराष्ट्र युवा विश्व वारकरी सेनेने दिला पंढरपूर येथे आमरण उपोषणाचा इशारा मागण्या मान्य...

युवा विश्व वारकरी सेनेने दिला पंढरपूर येथे आमरण उपोषणाचा इशारा मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 30 जुलै रोजी अमरण उपोषण करणार:- ह भ प गणेश महाराज शेटे

262

 

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

पंढरपूर // प्रतिनिधी
तुका म्हणे पापे ऐती रोगाची रूपे सध्या परिस्थिती जगात खूप पाप वाढलेले आहे आणि म्हणून सगळीकडे रोग पसरलेला आहे आणि हा रोग नाहीसा करायचा असेल तर संतांचे आणि भगवंताचे नामस्मरण करणे एक मात्र प्रभावी साधन आहे तुका म्हणे पापे जाती संतांच्या जापे किंवा नामाच्या चिंतणे पळती बारा वाटा विघणे आणि संतांचे प्रमाण त्रीकाल ही खोटे होणार नाही

पण आज सरकारने वारकरी संप्रदायातील साधक मंडळीला भजन-कीर्तन करण्यावर बंदी आणलेली आहे सरकारने देशी दारूची दुकाने उघडी केली, लग्नामध्ये 50 पाहुण्यांना परवानगी दिली, चित्रपट सृष्टी व्हिडिओ शूटिंग ला परवानगी मिळाली, मॉल उघडले गेले, बँकांच्या समोर कितीतरी मोठी रांग आहेत गर्दी आहे,राजकीय नेते दौऱ्यावर गेले तर सहज त्यांच्यासोबत पन्नास, शंभर लोक दिसून येतात मग वारकरी संप्रदाय वरच का हा अत्याचार संतांची परंपरा सांभाळणाऱ्या नामदेव महाराजांच्या वंशजानवर गुन्हे दाखल केले आणि संतपरंपरेचा अपमान करणाऱ्या फूबाईफू कार्यक्रमात ज्यांनी भूमिका वठवली आणि त्यांची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली त्यांच्यावर गुन्हे का नोंदवल्या जात नाहीत सध्या पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र वगळता देवस्थाने उघडी केलेली आहे मग महाराष्ट्राचे देवस्थान का बंद ठेवावे

मज्जित मधून लाऊस स्पीकर मधुन दिवसातून पाच वेळा नमाज पडल्या जात आहे आमचा कोणत्याही धर्माला अजिबात विरोध नाही त्यांनी त्यांचे कार्य जोरात करावे पण मंदिरावरील लाऊड स्पीकरवर भजन-कीर्तन केले तरच तुम्ही ध्वनी प्रदूषण होते असा आक्षेप का घेता व वेळेचे बंधन हिंदू ला च का कायदा हा सर्वांन करीता सारखा असावा

यावरून सिद्ध होत आहे की सरकारचा करोणा संकटाचे नाव समोर करून हिंदू धर्माच्या वारकरी संप्रदायातील चालीरीती व मंदिर बंद पाडण्याचा कट दिसून येत आहे
या विषयावर आम्ही वेळोवेळी सरकारला मेलद्वारे पत्रव्यवहार करून कोणतेही उत्तर न मिळाल्या मुळे पंढरपूर येथे आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे

आमरण उपोषणाला बसनारी महाराज मंडळी

ह भ प अरुण महाराज बुरघाटे विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष,

ह भ प श्री गणेश महाराज शेटे युवा विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष

जगन्नाथ महाराज देशमुख विश्व वारकरी सेना राष्ट्रीय अध्यक्ष,

ह भ प तुकाराम महाराज चवरे
विश्व वारकरी सेना राष्ट्रीय अध्यक्ष ( जेष्ठ )

ह भ प तुकाराम महाराज भोसले
विश्व वारकरी सेना संपर्क प्रमुख

ह भ प श्री सुधाकर महाराज इंगळे अखिल वारकरी मंडळ संस्थापक अध्यक्ष

मागण्या पुढील प्रमाणे
१) नामदेव महाराजांच्या वंशजांन वर पंढरपूर येथे गुन्हे दाखल केले ते त्वरित मागे घेण्यात यावे

२) श्रावण महिन्यात गोकुळ अष्टमी पासूनच भजन-कीर्तन करण्याकरिता किमान ५० भाविकांना नियम व अटी लावून परवानगी देण्यात यावी

३) झी मराठी या वाहिनीवर फु बाई फु या कार्यक्रमामध्ये निलेश साबळे, ऋषिकेश जोशी ,लीना भागवत यांनी कीर्तन परंपरेचा अपमान केल्याबद्दल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी

४) ह भ प निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा मागे घेण्यात यावा

५) महाराष्ट्रातील देवस्थाने नियम अटी लाऊन ऊघडन्यात यावे

६) लाऊस्पीकर चा नियम मंदिर मज्जीत करिता एक सारखा असावा

महाराष्ट्रातील सर्व वारकरी संघटना एकत्र येणे फार महत्त्वाचे आहे आपण आज संघटित झालो नाही तर भविष्यात कोणीही या कार्यातून पुढे पाऊल टाकणार नाही या बाबीचा गांभीर्याने विचार करावा म्हनुन सर्व सक्रिय वारकरी संघटना व राजकीय पक्षांना आणि सामाजिक संघटनांना नम्र विनंती आहे की या आमरण उपोषणाला लेखी स्वरूपात जाहीर पाठिंब्याचे पत्र माझ्या व्हाट्सअप नंबर वर पाठवा हे सर्व पत्र मेल व्दारे सरकारला पोहोचवल्या जातील .

Previous articleयवतमाळ जिल्ह्यात तिन दिवस संपुर्ण लाँकडाऊन करा- राजु धावंजेवार
Next articleयवतमाळ कोरोना अपडेट, तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 22 जण नव्याने पॉझेटिव्ह  ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 22 जणांना डिस्चार्ज