यवतमाळ जिल्ह्यात तिन दिवस संपुर्ण लाँकडाऊन करा- राजु धावंजेवार

 

यवतमाळ/ परशुराम पोटे

कोरोना हा संसर्गजन्य रोग देशामध्ये झपाट्याने पसरत असुन या रोगाचे महाराष्टात सर्वात जास्त रुग्ण आढळुन येत आहे. महाराष्टातील यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा कोरोना कोविड-19 हा रोग वेगाने पसरत आहे. जिल्हाधिकारी एम.डि.सिंह यांच्या कार्यकाळात अतिषय चांगले कार्य दिसत असुन आपल्या कडक धोरणामुळे जिल्ह्यात बर्याच प्रमाणात कोरोना रोग नियंत्रणात आहे.असे निवेदनात म्हटले आहे
निवेदनात असेही म्हटले आहे की, यवतमाळ जिल्ह्यातील बरेच नागरीक कारण नसतांना घराबाहेर पडतात.तसेच मास्कचा वापर सुद्धा कमी प्रमाणात करतात.महाराष्टातील बर्याच जिल्ह्यात 3 ते 7 दिवसापर्यंत संपुर्ण लाँकडाऊन केल्या जात आहे. त्याच प्रमाणे यवतमाळ जिल्ह्यात किमान 3 दिवस संपुर्ण लाकडाऊन घोषित केल्यास नक्कीच कोरोना कोविड-19 या रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल असे विदर्भ जाग्रुत पत्रकार संघाचे अध्यक्ष राजु धावंजेवार यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.