जिल्ह्यात 52 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

271

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे मागील 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये जिल्ह्यात 52 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1 हजार 262 झाली आहे. दरम्यान 23 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 749 झाली आहे. नव्याने पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय रत्नागिरी येथील 5 रुग्ण, घरडा खेड 22 (यामुळे घरडा केमिकल्स मधील एकूण पॉझिटिव्हची संख्या 132 झाली), उपजिल्हा रुग्णालय कामथे १४, दापोली ५ आणि लांजा येथील ६ रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 1 हजार 262 असून यापैकी बरे झालेले रुग्ण 749 आहेत तर आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दखल न्यूज भारत