आदित्य सारखे यश मिळवा – शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात शिरोलीचा आदित्य मोरे विज्ञान शाखेत ८८ टक्के गुण मिळवुन प्रथम

0
245

 

दिलीप अहिनवे
मुलुंड मुंबई उपनगर प्रतिनिधी
दखल न्युज भारत
मोबा. 9323548658

जुन्नर, दि. २० : जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय वसलेले आहे. नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. शिरोली खुर्द गावातील आदित्य मोरे या महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकत होता. त्याने ८८ टक्के गुण मिळवुन महाविद्यालयातुन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. आदित्यच्या या अप्रतिम यशामुळे शिरोली गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. सामाजिक बांधिलकी म्हणून शिरोली गावाच्या वतीने आदित्यचा नुकताच नागरी सत्कार करण्यात आला.

शिवसेनेचे नंदुरबार व धुळे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत शिरोली खुर्दच्या सरपंच साधनाताई नवनाथ मोरे यांच्या हस्ते आदित्यचा यथोचित सत्कार केला. शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी गावातील मुलांनी आदित्यचा आदर्श घेऊन आपले स्वत:चे, खानदानाचे व गावाचे नाव रोशन करण्याचे आवाहन केले. शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य आहे असेही सांगितले.

याप्रसंगी शाखा प्रमुख सुरेश ढोमसे, पोलीस पाटील विक्रम मोरे, उपसरपंच धोंडीभाऊ मोरे, रोहीदास थोरात, नामदेव ढोमसे, प्रवीण ढोमसे, शिक्षक नवनाथ ढोमसे, सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा ढोमसे, आदित्यची आई वनिता, वडील भरत मोरे, चुलते सुरेश मोरे हे उपस्थित होते.

आदित्यने मिळवलेल्या या अप्रतिम यशामुळे सर्व स्तरातुन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. उपस्थितांनी आदित्य, त्याचे आई-वडील यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.