घरोघरी कोविड टेस्टिंग ट्रेसिंगला मजगांव गावातून सुरवात

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी : ग्रामपंचायत मजगांव व एहसास चॅरिटेबल ट्रस्ट मजगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मजगांव गावात घरोघरी जाऊन कोविड टेस्टिंग ट्रेसिंगला सुरवात करण्यात आली.ग्रामस्थांचे थर्मल स्क्रिनिंग व ऑक्सिमिटरच्या सहाय्याने टेस्टिंग केलं जातं आहे.महाराष्ट्र राज्यात प्रथमच ग्रामपंचायत पातळीवर असा उपक्रम राबविला जात असल्याने या उपक्रमाचे गावातून कौतुक केले जात आहे.व नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सदर उपक्रम ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच ,सर्व समिती सदस्य व तंटामुक्त अध्यक्ष मजगांव आणि एहसास चॅरिटेबल ट्रस्ट मजगांव यांचे मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
तसेच यापूर्वी मा. मंत्री उदयजी सामंत यांचे आमदार फंडातून प्राप्त झालेल्या मास्क व साबण यांचे वाटप ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

दखल न्यूज भारत