जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय धानोरा १२ वि चा निकाल ८३%टक्के

धानोरा/भाविकदास करमनकर

स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय धानोरा यानि जोपासली उज्वल यशाची परंपरा महाविद्यालयातील फेब्रुवारी मार्च 2020 च्या उच्च माध्यमिक परीक्षेत एकूण 65 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होते त्यापैकी ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यातील पाच विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयातील तेजस माधव निकाडे हा 68.46%गुण घेऊन प्रथम तर मेनका अलनिया ही 66.15% टक्के गुण घेऊन व्दितिय तर कु हरिता कोरेटि 63.38% गुण घेऊन तृतीय आली या गुणवंत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डी एन तुंगिळवार रश्मी डोके प्रशांत साळवे प्रशांत तोटावर विजय साळवे रजनी मडावी रत्नागिरी बुरमवार कोल्हटकर देवकाते व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करून अभिनंदन करण्यात आले