Home नागपूर कळमेश्वर येथे भरदिवसा दांपत्यावर गोळीबार पति-पत्नी गंभीर जखमी

कळमेश्वर येथे भरदिवसा दांपत्यावर गोळीबार पति-पत्नी गंभीर जखमी

406

 

कळमेश्वर /नागपुर :२० जुलै २०२०
नागपुर जिल्ह्यातील कळमेश्वर शहरात एका दांपत्यावर गोळीबार घडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणेश मेश्राम व प्रिया गणेश मेश्राम अशी गोळीबार झालेल्या दाम्पत्याची नाव आहे… हे दाम्पत्य नागपुर नजीकच्या हिंगणा येथे राहणारे असून गेल्या काही दिवसांपासून कळमेश्वर येथे भाड्याने राहात होते.
आज सकाळी ११-१२ च्या दरम्यान त्यांच्यावर सात ते आठ तरुणांनी बेछूट गोळी बर केला…विशेष म्हणजे ही घटना सकाळी अगदी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर घडली. जखमींवर कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून नागपुर येथे हलविण्यात आले आहे. गोळीबाराच कारण अद्याप कळू शकलेलं नाही…
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जयताळा मधील मेश्राम गैंग चा लीडर गणेश मेश्राम याच्यावर गोळीबार झाला. यात गणेश मेश्राम गंभीर जख्मी असुन त्याची पत्नी प्रियंका मेश्राम सुद्धा जख्मी आहे. प्राप्त माहितीनुसार काही दिवसांपुर्वी प्रतापनगर मध्ये एका कुख्यात गुन्हेगार गोलु मलिया ची हत्या करन्याचा प्रयत्न गणेश मेश्राम यांने केला होता. त्याचा बदला म्हणुन ही घटना घड़लेली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नागपुर ग्रामीण पोलिस सदर गोळीबाराच्या घटनेचा तपास करीत आहेत. सदर घटना कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत घड़ली आहे. भविष्यात गैंगवार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. , जख़्मीना मेओ हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Previous articleलाॅकडाउन हा अंतिम पर्याय नाही: आयुक्त तुकाराम मुंढे शहरातील नागरिकांचा संभ्रम झाला दूर.
Next articleजिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय धानोरा १२ वि चा निकाल ८३%टक्के