अज्ञात महिलेची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

0
164

 

आशिष भगवान थूल(९८३४७१८२६८)
प्रतिनिधी
दखल न्यूज भारत नागपूर

नागपूर :- १८ जुलै २०२९
बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनिष नगर रेल्वे फाटकाजवळ आज दुपारी १२:१०च्या सूमारास एका अज्ञात महिलेने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या महिलेची ओळख आणि आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळावर धावून आले.मृत महिलेचे वय जवळपास ४० ते ५० वर्षे असल्याचे पोलीस सांगतात.शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास ती महिला मनिष नगर रेल्वे फाटकाजवळ आली.रेल्वे फाटका समोरून ती महिला काही अंतर पुढे पायी चालत गेली. काही वेळातच मालगाडी धडधडत येत असल्याचे दिसताच तिने रेल्वे गाडीसमोर क्षणात उडी मारली.बेलतरोडी पोलिसांनी महिलेच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह मेडिकलमध्ये उत्तरीय तपासणीकरिता पाठवला. मृत महिलेची ओळख पटविण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.