गडचिरोली येथील शिवसेना कार्यालय येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिन साजरा. गडचिरोली शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती.

0
67

 

सदाशिव माकडे (प्रतिनीधी)
(बातम्या व जाहिराती करीता मो.8275228020)
(गडचिरोली जिल्हा)

गडचिरोली :-
दिनांक 17 नाव्हेंबर 2020 रोजी गडचिरोली येथील शिवसेना कार्यालयामध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. दीप प्रज्वल व पुष्पहार अर्पण करून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार, उपजिल्हाप्रमुख राजुभाऊ कावळे, जिल्हा संघटक विलासजी कोडाप, गडचिरोली विधानसभा संघटक मा.नंदू भाऊ कुमरे, उपजिल्हाप्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार, अहेरी विधानसभा संन्मयक सुवर्णसिंग डांगी, माजी जिल्हाप्रमुख विजय भाऊ शृंगारपवार, शहर प्रमुख रामकीरीत यादव, सौ.अश्विनीताई यादव, सौ.अश्विनीताई चौधरी, शिवसेना तालुका प्रमुख गजानन नैताम, घनश्याम कोलते, माजी जि.प.सदस्य दिवाकर भोयर, चांदीदास मसराम, मोनु सलामे, महेंद्र सुल्वावार व शिवसैनिक उपस्थित होते.