पणज परीसरात लाँकडाउनला नागरिकांचा शंभर टक्के प्रतिसाद

0
146

 

आकोट शहर प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

अकोट तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलणे गरजेचे होते.कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने यावर प्रतिबंध घालण्यासाठी १८जुलै ते २२जुलै पर्यंत कडक लाँकडाउन करण्यात येत असून यामध्ये अकोट शहर व तालुक्यात १८ जुलै ते २२जुलै पर्यंत पाच दिवस स्वयंस्फूर्तीने लाँकडाउन पाळण्याचे आवाहनही शासना कडून करण्यात आले आहे.
या आवाहनाला प्रतिसाद देत आज ग्रामीण भागातील पणज परीसरात चांगला प्रतिसाद मिळत आहे व्यापारी व नागरिकांचा १०० % प्रतिसाद मिळत असून पणज या भागातील अत्याआवश्यक सेवा मेडीकल दवाखाने वगळता संपूर्ण दुकाने पूर्णपणे बंद आहेत.
यावेळी आकोट ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना कडक लाँकडाउन पाळण्याबाबत आवाहन केले आहे आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पणज परीसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी गावापर्यंत पोहोचत नागरिकांना लाँकडाउन यशस्वी करण्याची विनंती केली आहे त्यामुळे या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून किराणा दुकान बंद ठेवून पणज ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करीत नागरिक कडक लाँकडाउन यशस्वी करणार आहेत.व सर्व गावांमध्ये यशस्वी होत असलेला लाँकडाउन हा निश्चितच कोरोणाला हद्दपार करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल असे प्रतिपादन यावेळी अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी केले आहे.