गायीच्या दुधाला सरसकट १० रु. / लिटर अनुदान व दुध पावडरला प्रती किलो ५० रु. अनुदानाच्या मागणी करिता घनसावंगी तहसीलदारांना निवेदन

259

 

प्रतिनिधी सुदर्शन राऊत जालना

महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेदिवस भर पडत आहे. बँकेकडून नाकारल्या जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, कोकणातील शेतकऱ्यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटाच्या माळेमध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
महाराष्ट्रामध्ये १ कोटी ४० लाख लिटर गायीचे दुध उत्पादित होते. त्यापैकी ३५ लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केल्या जाते. ९० लाख लिटर दुध खाजगीसंस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतल्या जाते. १५ लाख लिटर दुध शेतकरी स्वत: हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितो. शासकीय योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दुध खरेदी केले जाते.
या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दुधाचा विक्रीमध्ये ३० टक्केपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध १५ ते १६ रु. दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दुध खरेदी केल्या जात आहे. मंत्र्याचे लागेबांधे असलेल्या दुध संघाकडून शासन दुध विकत घेत आहे. इतर शेतकऱ्यांना व दुध उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे.
गायीच्या दुधाला प्रती लिटर १० रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो ५० रु अनुदान, शासनाकडून ३० रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी या न्याय्य मागण्याकरिता आम्ही सर्व शेतकरी निवेदन देत आहोत दर आमच्या मागण्या 31 जुलैपर्यंत मान्य न झाल्यास भाजपा, रयत क्रांती संघटना. शिवसंग्राम . रासप. रिपाई आ. महायुती १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलन करीत आहोत.
या निवेद्नासोबातच गायीचे पवित्र दुध आपणास व आपल्या मंत्री मंडळातील सर्व सहकाऱ्याकरिता पाठवीत आहो. या पवित्र दुधाचे प्राशन करून आपण न्याय बुद्धीने वरील सर्व मागण्या मान्य कराल एवढीच अपेक्षा.
उपस्थित शिवाजी बोबडे तालुका अध्यक्ष भाजपा देवनाथ जाधव माजी तालुकाध्यक्ष संजय तोर उपजिल्हाध्यक्ष योगेश देशमुख युवा मोर्चा अध्यक्ष अशोक राजे जाधव विष्णुपंत जाधव तालुका विस्तारक शिवाजीराव पवार संभाजीराव घोगरे भरत उगले प्रताप कंटुले सुभाष घोगरे शेषनारायण मापारे भरत परदेशी लक्ष्मण खंडागळे अण्णा बोबडे सुरेश उगले विठ्ठल राव उगले गजानन राजे जाधव रघुनाथ सोसे प्रदीप धारतरकर