नागपुर च्या डोंगरगाव (पाचगाव) शिवारात डबल मर्डर ची धक्कादायक घटना संशयित आरोपी अटकेत

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

डोंगरगाव-पाचगाव (कुही) /नागपुर: १६ नोव्हेंबर २०२०
नागपुर जिल्ह्यातील कुही पोलीस स्टेशन अंतर्गत डोंगरगाव शिवारात काल रात्री दोन युवकांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या करुन फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आज सकाळी ७ – ८ वाजता परिसरातील नागरिकांना दोन्ही प्रेत दिसताच, त्यांनी कुही पोलिसांना कळवले कुही पोलीस स्टेशन अंतर्गत पाचगाव पोलिस चौकी येथे कार्यरत PSI भारत थिटे यांना कंट्रोल रुम कडुन प्राप्त सुचनेनंतर डोंगरगाव शिवारात पोलिस बंदोबस्तासह सकाळी १०:३० वाजता पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामे करुन डबल मर्डर घटनेसंदर्भात भांदवि ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही मयत युवकांची ओळख पटविण्यासाठी संबंधितांचे नातेवाईकांना बोलावले होते. त्यानंतर मयताची ओळख पटली असून दोन मयतांपैकी एकाचे नाव कुणाल सुरेश चरडे वय (२९) रा. नरसाळा, नागपुर तर दुसऱ्याचे नाव सुशील सुनील बावने वय (२४) रा. दिघोरी नागपूर आहे. हे दोघेही दिघोरी, नागपुर शहर येथील रहिवासी असुन त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचे नातेवाईक भाऊ अमित सुरेश चरडे व योगेश बावने हे डोंगरगाव पाचगाव येथे पोहोचले होते.
सकाळी १० :३० वाजता या डबल मर्डर ची माहिती मिळताच पाचगाव पोलिसांनी आपल्या तपासाची गती वाढवत ४ संशयित आरोपींना अटक केली असुन त्यांची सखोल चौकशी सुरु आहे. चौकशी पुर्ण होताच त्यांच्या विरोधात भादंवि अंतर्गत इतर गुन्हे ही दाखल होतील. या धक्कादायक व अमानुष डबल मर्डर चे नेमके काय कारण होते? हे तपासाअंती च माहिती पडेल.
सदर डबल मर्डर च्या घटनेचा तपास कुही पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंजाबराव परगणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत थिटे करीत आहेत.