जनता कर्फ्यू लावा ” सत्य शोधक संघ कन्हान” तर्फे तहसीलदार शहारे यांना निवेदन

 

कमलसिंह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत, नागपुर

कन्हान::-(ता प्र) कन्हान ला कामठीतुन येणाऱ्या दुकानदारांना व्यापारी व फेरीवाल्यांना प्रतिबंध लावा
कामठी शहर हे करोना चे हॉटस्पोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामठीमध्ये वाढते करोना पॉझिटिव पेशंट पाहता लागूनच असलेल्या कन्हान येथे कामठीतून येणारे व्यापारी दुकानदार फेरीवाले ,फळ विक्रेते करोना चा प्रादुर्भाव कमी होत पर्यंत कन्हान येण्यास प्रतिबंध लावण्यात यावा.
कामठीत आता पर्यन्तच्या आकडेवारी नुसार २०० पर्यन्त पोजीटिव्ह पेशनंट पोहचलेले आहेत. आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या 300 ते 350 व्यक्तींना कॉरर्नटाइन केले आहे. अश्या परिस्थितीत कामठीत कोरोना पॉजिटिव्ह संख्या उच्चांक गठण्याच्या उंबरठ्यावर आहे.
महत्त्वाचे म्हणजे कामठी शहरातुन 60% व्यवसायिक कन्हान येथे व्यापार करण्याकरिता येतात ह्यात छोटे मोठे दुकानदार फळविक्रेते फेरीवाले कपडे वाले व इतर लोक कन्हान येथे व्यापार व पोटभरण्यास येतात. ज्याचे मुख्य रस्त्यावर 60 टक्के व्यवसाय आहे. त्यात प्रामुख्याने सोनार मोबाईल दुकाने, किराणा दुकान चप्पल बूट, कपडे वाले हॉटेल व इतर छोटे व्यापारी व्यवसायीक आहे.कन्हान येथे कमाईचे साधन म्हणून हे व्यापारी येतात अशा परिस्थितीत सुद्धा शासनाने व नगर परिषद मुख्य अधिकारी, नगराध्यक्षनी ह्या माहामारीला गंभीरतेने घेतले नाही.आता तरी कन्हान नगरवासियाच्या आरोग्याशी न खेळता कन्हान येथील बाहेरून व इतर गावातून तसेच कामठीतून येणाऱ्या व्यासायिक व्यापाऱ्यांचे फळं विक्रीता, फेरीवाले याचे *आरोग्य तपासणी व चाचणी करून कोविड 19 ची टेस्ट करावी व त्यांना फिटनेस सर्टीफिकेटच्या* आधारावरतसेच जे व्यावसायिक , व्यापारी मास्क व सॅनिटाईजर आणि सोशल डिस्टनशिंग चे पालन करतील* अश्याच व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी. नियमांचे काटेकोर पणे पालन न करणाऱ्या व्यापारी / व्यावसायिकांवर प्रतिबंध लावण्यात यावा अन्यथा कन्हान शहरात सुद्धा करोना महामारीचा प्रकोप कन्हानमध्ये प्रवेश व प्रसार करण्यात कोणीही टाळू शकत नाही.तसेच “जनता कर्फ्यू*”अशी मागणी ” सत्य शोधक संघ कन्हान” तर्फे
मा. तहसीलदार ,
मा. मुख्यधिकारी साहेब ,
मा. नगराध्यक्षा न.पा.कन्हान – पिपरी ,
उपविभागीय पोलीस अधिकारी कामठी-कन्हान ,
पोलीस निरीक्षक कन्हान यांना निवेदन देण्यात आले. या वेळी
सतीश भासरकर(सत्यशोधक समाज), रजनीश मेश्राम, प्रशांत वाघमारे(उपाध्यक्ष अनुसुचित जाती विभाग कोग्रंस), शैलेश माटे, गौतम नितनवरे ,अखिलेश मेश्राम , मयूर माटे, विक्की उके , निखिल रामटेके(सामाजिक कायकर्ते) उपस्थीत होते.