कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई: डीवायएसपी नवनाथ ढवळे यांचा इशारा

143

 

प्रतिनिधी :- ओंकार रेळेकर.

चिपळूण : कोरोनाबाबत कोणीही सोशल मीडिया अथवा अन्य ठिकाणी अफवा पसरवल्यास अशांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी दिला आहे. ते म्हणाले, प्रत्येक गावांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती होत आहे. ग्रामकृती दल कार्यरत आहे. गावात येणाऱ्या व जाणारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. प्रशासन तसेच आरोग्य यंत्रणादेखील सतर्क आहे. एखाद्या व्यक्तीचा तपासणीसाठी गेलेला रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्यास आरोग्य यंत्रणा आवश्यक ती पुढील कार्यवाही करते. त्या व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येते, तसेच त्या व्यक्तीच्या घरातील सदस्यांचेही स्वाब घेऊन त्यांना क्वारंटाईन केले जाते. असे असतानाही कोरनाविषयी काही गावांमध्ये अफवा पसरवल्या जात आहेत, परिणामी गावात भीती पसरत आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही श्री. ढवळे यांनी केले आहे.

*दखल न्यूज भारत*