घुग्घुस येथील स्थानीक ट्रक मालकांना काम देण्याची मागणी अन्यथा रस्तारोको आंदोलन करुन कोळसा वाहतुक बंद करनार

141

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
घुग्घुस परिसरातील वेकोलीच्या कोळसा खाणीतुन कोळसा वाहतुक करण्याचे कंत्राट एच आर जी, डि ए आर सिएल, चढ्ढा ट्रान्सपोर्ट, कॅलिबर व गोलछा या बड्या कंपण्यांना दिला त्यामुळे स्थानीक एकेरी ट्रक मालकांवर उपास मारीची वेळ आली आहे. बड्या ट्रान्सपोर्ट कंपण्या कंपण्या एकेरी ट्रक मालकांच्या गाड्या वाहतुकीसाठी लावत नाही त्यामुळे हे ट्रक मालक संकटात सापडले आहे.
कमी भाड़े दराने ह्या बड्या कंपण्या कोळसा वाहतुक करीत आहे. कोळसा खाणीतुन कोळसा वाहतुकीत घोटाळा होत आहे, असा आरोप पत्रकार परिषदेतुन करण्यात आला आहे. काम नसल्याने स्थानीक ट्रक मालकांचे १५० ते २०० ट्रक हे उभे आहे. त्यामुळे स्थानिक एकेरी ट्रक मालकांच्या गाड्या बड्या ट्रान्सपोर्ट कंपण्यांनी लावाव्या अशी मागणी करण्यात आली आहे. 150 एकेरी ट्रक मालकां मुळे 1200 लोकना रोजगार मिळतो. या 1200 लोकांच्या भरवश्या वर 6000 लोकांची पोटा पाण्याची व्यवस्था होत असते. त्या सरवांवर उपासमारी ची वेळ आली आहे. त्या मुळे या एकेरी ट्रक मालक परिवारावर हलाकि ची परिस्थिति आली आहे.
पत्रकार परिषदेत राष्ट्रीय जनरल मजदुर युनियन चंद्रपूर घुग्घुस चे अध्यक्ष श्रीनिवास गोसकुला, कार्याध्यक्ष राकेश खोब्रागडे, सरचिटनीस सुदर्शन पोलु, कोषाध्यक्ष संतोष गुप्ता, उपाध्यक्ष श्याम आरकिल्ला, सचिव रोहीत जयस्वाल, उपाध्यक्ष भास्कर कलवेनी व सतिश कोहळे उपस्थित होते.