पांढरकवडा येथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश

150

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
नुकतेच पांढरकवडा येथे शिवसेना पक्षा मध्ये अनेक युवकांनी प्रवेश घेतला. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून व युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे यांच्या नेतृत्वात पांढरकवडा गावातील अनेक युवकांनी शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश घेतला . शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या आदेशाने प्रफुल्ल ढवरे यांची पांढरकवडा युवा सेना शाखाप्रमुख व सचिन वाडगुरे यांची युवा सेना उपशाखाप्रमुख नियुक्ती करण्यात आली . नियुक्तीपत्र देताना युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे चेतन बोबडे कोमल ठाकरे महेश शेंडे व पांढरकवडा गावातील शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.