महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर माया परमेश्वर यांनी केली सविस्तर चर्चा….

0
396

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

आज दि.१२.११.२०२० रोजी दुपारी १.०० वाजता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांची संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर यांनी त्यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.

सदर चर्चेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भाऊबीजभेटीच्या रकमेत वाढ करावी, भाऊबीज भेटीची रक्कम तसेच ऑक्टोबरचे मानधन दिवाळी पूर्वी देण्यात यावी, शासनाने जाहीर केलेल्या समान किमान कार्यक्रमानुसार अंगणवाडी सेविका मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविकांना भरीव मानधनवाढ द्यावी, सेवा समाप्ती एक रकमी लाभाची प्रकरणे दिवाळीपूर्वी निकालीत काढावीत, कोरोनाच्या काळात आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेत आपला जीव धोक्यात घालून योगदान देणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात यावा. यासह अन्य मागण्यांवर मंत्रीमहोदयांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरवर्षाप्रमाणे भाऊबीज भेट रकमेचा प्रस्ताव तयार असून तातडीने तो मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. ऑक्टोबरचे मानधन दिवाळीपूर्वी अदा करण्यात येईल. कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता ताबडतोब देण्यासाठी संबंधितांना सुचना देण्यात येतील सेवासमाप्ती लाभाची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासह अन्य मागण्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक भुमिका घेणार असेही श्रीमती ठाकूर यांनी चर्चेत सांगितले चर्चेअंती मंत्रीमहोदयांनी राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. असे संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी कळविले आहे.