अंगणवाडी सेविकांना कोरोना कामातून वगळावे: विष्णू आंब्रे

165

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : अंगणवाडी सेविकांना त्यांची मुळ कामे पार पाडण्यासाठी कोरोना विषयक कामातून वगळावे, अशी मागणी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे संघटक चिटणीस विष्णू आंब्रे यांनी केली आहे.
अंगणवाडी सेविकांना नागरी व ग्रामीण •ाागात कोरोना संबंधित कामे करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन वि•ाागाकडून सक्ती करण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी नागरिकांना प्रत्यक्ष गृह•ोटी देऊन ताप सर्दी व खोकला आदी लक्षणे असलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यासाठी दडपशाही व सक्ती करण्यात येत आहे. कोरोनाविषयक कामे सांगितल्यास त्यांच्या कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्क झाल्यास त्यांच्यामार्फत ला•ाार्थी, गरोदर व स्तनदा मातांना संसर्ग होऊ शकतो. ही बाब कृती समितीने वारंवार निवेदने देऊन महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर व आयुक्त इंद्रा मालो यांच्या निदर्शनास आणून दिली.
या पार्श्व•ाुमीवर १५ जुलैला मंत्री ठाकुर यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी समितीला प्रमुखांना चर्चेसाठी बोलावले होते. त्यावेळी आयुक्त इंदा मालो व कृती समितीचे एम. ए. पाटील उपस्थित होते. या बैठकीत कोरोना विषयक कामासंबंधी चर्चा झाली. अंगणवाडी केंद्र उघडे ठेवण्याबाबत येथे अंगणवाडी सेविकांना शासनाकडून कोणतेही निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे अंगणवाडी सेविकेने अंगणवाडी केंद्र उघडून तेथे पुर्ण बसावे, असे कोणतेही निर्देश देण्यात आलेली नाहीत. अंगणवाडी सेविकांनी सीएएसवर आपले कर्तव्य पार पाडणे म्हणजेच अंगणवाडी केंद्र सुरु असणे, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
अंगणवाडी मदतनिसांचे अंगणवाडी सेविकापदी थेट नियुक्ती करण्यासाठी शासनाचे व कृती समितीचे एकमत झाल्याशिवाय मदतनिसांचे प्रमोशन सेविका पदी करु नये, मोबाईल दुरुस्तीचा खर्च शासनाने करावा, आदी मागण्याबाबत कृती समिती समवेत झुम बैठक शासनाने घ्यावी व हे प्रश्न सोडवावेत, असे निवेदन कृती समितीने दिले.

दखल न्यूज भारत