Home शैक्षणिक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

128

 

प्रतिनिधी
बिंबिसार शाहारे/ राहुल उके
दखल न्यूज भारत

पवनी : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत पवनी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे नगरातून प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ,पुस्तक व मिठाई देऊन भारतमातेला पुन्हा एकदा विश्वगुरू पदावर विराजमान करण्यासाठी चाललेल्या या राष्ट्रकार्यात आपले कर्तृत्व व साधना भारतमातेच्या चरणी समर्पित व्हावि व आपल्या सदगुणांचा उपयोग राष्ट्राला परमवैभवाकडे नेण्यासाठी व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत शुभेच्छा देण्यात आले. त्यामध्ये स्थानिक वैनगंगा महाविद्यालयातील हर्षल बिसने याने गणित विषयात १०० पैकी १०० गुण घेत ८९.५४ टक्के गुण मिळवून पवनी येथून प्रथम येण्याचा मान पटकावला तर प्रविण गभणे याने सुद्धा गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून ८८.४६ टक्के गुण मिळवून द्वितीय येण्याचा मान पटकावला. दोघांनीही आपल्या यशाचे क्षेय आपल्या शिक्षकांना व आई वडिलांना दिला.
शुभेच्छा देतेवेळी अभाविप नगर अध्यक्ष प्रा.राम भोपे, प्रा.महादेव पचारे, अड्याळ-पवनी भाग संयोजक स्नेहांकित गोटाफोडे, नगरमंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अखिल मुंडले, TSVK विदर्भ प्रांत सहप्रमुख संघर्ष अवसरे, योगेश बावनकर, हिमांशू थोटे, साहिल चव्हाण, निशांत नंदनवार, चेतन पडोळे, तुषार ढवळे, वैदेही पोर्लिकर,निकिता बावनकर, प्रियंका मेश्राम, प्रांजली मेश्राम, निशा बावनकर, स्नेहा तेलमासरे, निकिता काटेखाये, दिपाली मुंडले व आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleलाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत परिचारिका शोभराणी कोंडावार यांचा ब्रेन मलेरियाने मृत्यू……
Next articleअंगणवाडी सेविकांना कोरोना कामातून वगळावे: विष्णू आंब्रे