Home गडचिरोली लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत परिचारिका शोभराणी कोंडावार यांचा ब्रेन मलेरियाने मृत्यू……

लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत परिचारिका शोभराणी कोंडावार यांचा ब्रेन मलेरियाने मृत्यू……

251

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम:भामरागड तालुक्यातील अति दुर्गम, अतिसंवेदनशील भागातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या शोभराणी कोंडावार यांचा ब्रेन मलेरियाने निधन झाले आहे.
सदर परिचारिका शोभराणी हिचा नुकतेच सिरोंचा तालुक्यातील मोयाबीनपेटा येथून लाहेरी केंद्रात बदली झाली होती.
शोभराणी यांना ब्रेन मलेरिया आजार झाल्याचे कळताच तात्काळ वर्धा येथे उपचाराकरिता घेऊन गेले मात्र तेथील डाँक्टरांनी मृत्यू घोषित केले होते.शोभराणी ही सिरोंचा येथील श्री गजानन कोंडावार यांची मुलगी होती.शोभराणी स्वतःआरोग्य विभागाचे कर्मचारी असुन वेळेवर उपचार न झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.हेच दुर्गम भागातील बिघडलेले आरोग्य व्यवस्था ने शोभराणीचा बळी घेतला आहे.मलेरिया, ब्रेन मलेरिया असे अनेक जीवघेणे आजार दुर्गम भागासाठी आव्हान ठरलेला आहे.दुर्गम भागातील आरोग्याची अवस्था कधी सुधारणार हा मोठा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे.

Previous articleकोरोना महासंकट आणि निसर्ग चक्रीवादळाने नुकसान ग्रस्त धनगरवाडी ची अवस्था बेहाल दानशूर धनगर समाज बांधवांनी केली मदत.
Next articleअखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार