कोरोना महासंकट आणि निसर्ग चक्रीवादळाने नुकसान ग्रस्त धनगरवाडी ची अवस्था बेहाल दानशूर धनगर समाज बांधवांनी केली मदत.

202

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

खेड :- खेड ,मंडणगड, दापोली या भागात सर्वात जास्त निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झाले असून सर्व धनगर समाज भयभीत झाला होता ,सर्व वस्ती ही डोगर दऱ्या मध्ये वस्ती असल्याने वादळाने झोडपून काढले आहे. अनेक भागात शासनाकडून मदत पोहोचली नाही पोहोचली तीदेखील अत्यल्प. ही बाब लक्षात घेऊन सतत समाजासाठी तळमळीने काम करणारे, समाजासाठी तत्पर ,समाजसेवक मा. श्री रामचंद्र बाबु आखाडे यांनी दुःख पहावले नाही. त्यांनी तातडीने मदत मिळण्यासाठी आव्हाहन केले. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मा श्री. रामचंद्र बाबु आखाडे मंचाचे उपाध्यक्ष -धोंडू अण्णा साहेब गोरे यांनी पाहणीसाठी एक शिस्ट मंडळ पाठवले दिनांक 17 जून 2020 रोजी काही सदस्य, यांनी पाहणी केली त्यामध्ये प्रशांत आखाडे – रत्नागिरी जिल्हा युवा अध्यक्ष, समीर आखाडे- खेड तालुका युवा सचिव, राकेश आखाडे- खोपी विभाग प्रमुख, संतोष (पप्प्या )आखाडे ही सर्व बाब महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच राज्य कार्यकारणी सदस्य अनिल झोरे सर यांना समजल्यानंतर त्यांनी पुढिल वाटचालीस सुरवात केली.
व्हाट्सअप्प च्या माध्यमातून sms तयार करून एक समाज बांधवांना मदतीसाठी आव्हान केले. त्यातून 280 जिवन आवश्यक किट साठी पैसे जमा झाले. या प्रामाणिक कामाची दखल घेऊन 2 NGO ने आपल्या लोकांसाठी मोठी मदत केली. मा श्री शांताराम माने आणि सौ रसीका आखाडे हे दोघेही MSW समाज विकास अधिकारी आहेत. त्यांनी 500 किट आणि 150 ताडपत्री दिल्या आहेत .त्यांचे वाटप मंडणगड, दापोली,खेड मधील धनगर वाडी वस्तीत करण्यात आले.वाटप करण्यासाठी स्वतः राज्य कार्यकारणी सदस्य- अनिल झोरे उपस्थित होते.तसेच रत्नागिरी जिल्हाअध्यक्ष – मा. श्री रामचंद्र बाबू आखाडे, उपाध्यक्ष – धोंडू (अण्णासाहेब ) गोरे, भिकू जानकर – कर्मचारी/ पदाधिकारी खेड तालुका अध्यक्ष, प्रशांत आखाडे- रत्नागिरी जिल्हा युवा अध्यक्ष, समीर आखाडे – खेड तालुका युवा सचिव, संतोष (पप्या )आखाडे, संकोच आखाडे, सचिन जानकर, लक्क्षुन शिंदे जीवनावश्यक वस्तू आणि ताडपत्री वाटप केलेल्या वाडी वस्ती वरील लोकांनी सर्व समाज बांधव व कार्यकर्ते याचे आभार मानले. व शासनाने देखील अशीच मदत करावी असा सुर धनगर वाडी वस्ती मधील नागरिकांनी व्यक्त केला.

*दखल न्यूज भारत*