डीजीके महाविद्यालयाला अतुल जोग यांची सदिच्छा भेट.

0
77

 

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरी :- वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय संघटनमंत्री श्री अतुल रामचंद्र जोग यांनी भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी भारत शिक्षण मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे उपस्थित होते.
भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेले श्री अतुल जोग यांनी या भेटीदरम्यान महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासोबत संवाद साधून महाविद्यालयाच्या शैक्षणिक तसेच अभ्यासेतर उपक्रमांची माहिती घेतली व समाधान व्यक्त करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी गुरुवर्य रामचंद्र जोग गुरुकुलचे प्रबंधक मनोज जाधव उपस्थित होते.

*दखल न्यूज भारत*