दापोलीत साकुर्डेजनीक अज्ञात वाहनाची धडक बसून एका बिबट्याचा मृत्यू

102

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

दापोली :- साकुर्डेजनीक अज्ञात वाहनाची धडक बसून एका बिबट्याचा मृत्यू झाला.दापोली तालुक्यातील साकुर्डे गाbवानजीक एका तीन ते चार महिन्यांच्या बिबट्याच्या बछड्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. १६ जुलै रोजी ही घटना घडली आहे. साकुर्डे-कुंभारखाणीनजीक त्रिमूर्ती बागेजवळ ही घटना घडली आहे.
दापोली वन विभागाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि शवविच्छेदन करून त्याच्यावर नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती दापोली वन विभागाकडून देण्यात आली.

*दखल न्यूज भारत*