एक दिवस कोविड योद्धा यांच्यासाठी धनज पोलीस स्टेशन मध्ये पोलीस प्रशासनाला सॅनिटायझर व मास्क वाटप

113

 

वाशिम प्रतिनिधी:- आशिष धोंगडे

वाशिम:- आज दि.19/7/2020 रोजी कोविड-१९ सारख्या महाभयानक रोगाला आटोक्यात आणण्यासाठी अनुभव शिक्षा केंद्र वाशिम व क्षितिज फाउंडेशन ग्राम हिंगणवाडी आयोजित वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील धनज पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकाऱ्यांना सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. त्यामध्ये उपस्थित मान्यवर म्हणून धनज पोलिस स्टेशनचे ठाणेदार मा. श्री. अनिल ठाकरे उपस्थित होते. तसेच धनज पंचायत समिती सदस्य मा. श्री मयूरभाऊ मस्के उपस्थित होते व अनुभव शिक्षा केंद्र वाशिम जिल्हा समन्वयक मा. श्री. आशिष धोंगडे आणि क्षितिज फाउंडेशनचे अतुल राजेंद्र राऊत (मेळघाट मित्र मंडळ) उपस्थित होते व याप्रकारे धनज पोलीस स्टेशन येथे सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले.अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला.
व सर्व गावकरी मंडळी यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.

वाशिम प्रतिनिधी
आशिष धोंगडे
दखल न्युज भारत