लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याच्या स्मृतीदीना निमित्त धनज (बु) विचार मंथन

 

वाशिम प्रतिनिधी:- आशिष धोंगडे
धनज (बु) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 51 व्या स्मृती दीना निमित्त विचार मंथनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते,या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जि. प
सदस्य चंद्रशेखर डोईफोडे यांनी उपस्थित युवकांना अण्णाभाऊ साठे याच्या विचारांना प्रेरित होऊन स्वतःचा व समाजाचा विकास करायचा असेल तर व्यसना पासून दूर राहावे अशी विनंती करत,कोरोना ला रोखण्यासाठी आपण स्वतःच काही उपयोजना कराव्यात याबद्दल मार्गदर्शन केले,या वेळी प.स.सदस्य मयूर मस्के,धम्मपाल गवाई,उमेश भाऊ बोरकर,शुभम वानखडे,दिलीप टाके,रोशन शेंदुरसे, आकाश निघोट, आदी मंडळी उपस्थित होते, कार्यक्रमाचे आयोजन अक्षय गडलिंग, शुभम चव्हाण व अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ यांनी केले या वेळी फिजिकल अंतर ठरवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते…

वाशिम प्रतिनिधी
आशिष धोंगडे
दखल न्युज भारत