जांभरूनघाट लघु सिंचाई प्रकल्पाचा कालव्याचे बांधकाम पूर्ण करा.(परिसरातील शेतकर्यां ची मागणी)

0
77

 

कूरखेडा/राकेश चव्हाण प्र

जांभरूनघाट लघु सिंचाई प्रकल्पाचा बांधकामाला पाच वर्षापेक्षा अधिक चा कालावधी झालेला आहे मात्र कालव्याचे बांधकाम अतिशय संत गतीने सूरू असल्याने हे अपूरे आहेत व शेतकरी सिंचनाचा लाभापासून वंचीत होत आहेत शाशनाने याकडे लक्ष पूरवत ही रेगांळलेली कामे तातडीने पूर्ण करावी अशी मागणी शेतकर्याकडून करण्यात येत आहे.
येगंलखेडा पासून अगदी दोन कीलोमीटर अंतरावर तत्कालीन आमदार आनंदराव गेडाम यांचा पाठपूराव्याने जांभरूनघाट लघु सिंचाई प्रकल्पाचा बांधकामाला मंजूरी मीळत काम पूर्णत्वास आले प्रकल्पात पूरेसा प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध आहे या सिंचन प्रकल्पाचा लाभ येगंलखेडा ,चिचेवाडा ,बांधगाव व परिसरातील पंधरा ते विस गावातील शेतकर्याना होणार आहे.त्याना दुबार धानाचे पिक घेण्यास या कालव्याचे पाणी उपयोगी पडू शकतो. मात्र कालव्याचे काम अतिशय संथ गतीने सूरू असल्याने प्रकल्पात पाण्याचा साठा असतानाही शेतकर्याना सिंचणाकरीता त्याचा लाभ होत नाही. तरी तातडीने कालव्यांचे अपूरे बांधकाम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी परीसरातील शेतकर्यानी केली आहे.