Home क्राइम रत्नागिरी शहरात महिलेची आत्महत्या

रत्नागिरी शहरात महिलेची आत्महत्या

258

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी – नाचणे येथील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरीफा हुसेन नेवरेकर ( वय ५८ , रा . आशियाना अपार्टमेंट , एमएसईबी पॉवर हाउस , नाचणे , रत्नागिरी ) असे मृत महिलेचे नाव आहे . ही घटना मंगळवारी ( ता . १४ ) ते शनिवारी ( ता . १८ ) या कालावधीत घडली असून शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास निदर्शनास आली . पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरीफा या एकट्याच फ्लॅटमध्ये राहात होत्या. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. आजारपणामुळे त्या त्रस्त होत्या. गेले तीन दिवस त्यांचा मुलगा त्यांना फोन करत होता . तीन दिवस फोन न लागल्यामुळे तो बघण्यासाठी आला असता फ्लॅटमधील बेडरूमच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आले . या प्रकरणी मुलगा नवाज हुसेन नेवरेकर याने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली.

*दखल न्यूज भारत*

Previous articleकमलापूर येथील मुख्य चौकात अतिक्रमण …
Next articleविविध मागण्यांसाठी विश्व वारकरी सेनेचे चे दिनांक 30 जुलै रोजी पंढरपूर येथील नामदेव पायरी जवळ आमरण उपोषण होणार:- ह भ प गणेश महाराज शेटे