वीज पडून महिला ठार

208

मधुकर उंदिरवाडे
ग्रामीण प्रतिनिधी
केरोडा ॒दि .१९ केरोडा येथील महिला सौ.उषा राजेंद्र वालदे हि शेतात भात रोवण्यासाठी गेली असता अंगावर वीज पडून ठार झाली.सध्या शेती हंगाम सूरू असून नेहमी प्रमाणे मृत महिला शेतात रोवण्यासाठी गेली होती. संध्याकाळी ५ वाजता ढग आणि वीजाचा
कडकडाट सूरू झाला. इतक्यात अंगावर वीज पडल्याने उषा राजेंद्र वालदे हि महिला जागीच ठार झाली.घटनेची माहिती तहसिलदार व पोलीस अधीक्षकाना देण्यात आली. सावली तहसिलचे तहसिलदार कांबळे साहेब घटना स्थळी येऊन प्रेत शवविछेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सावली येथे पाठविण्यात आले. मृत महिलेच्या पश्चात पती व दोन मुलं आहेत. केरोडा गावात शोककळा पसरली असून मृत महिलेच्या कुटुंबाना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे.