पारशिवनीत कोरोनाचा शिरकाव; एक पॉझिटिव

0
185

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिथी
दखल न्युज भारत,नागपुर

पारशिवनी :-(ता प्र)येथील स्वॅब कलेक्शन सेंटरमध्ये शनिवारी कोविड संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यात एक पोलिस शिपाई पॉझिटिव्ह आढळल्याने खडबळ उडाली आहे.
महात्मा गांधी विद्यालयातील स्वॅब कलेक्शन सेंटरमध्ये आज ६६ जणांची तपासणी करण्यात आली. यात पाराशिवनी पोलिस स्टेशन चे पोलिस कर्मचारी वर्गाची देखील तपासणी केली असता एक पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला. तो कामठी तालुक्यातील येरखेडा येथे राहतो. तेथूनच त्याला लागण झाली असावी, अशी शक्यता आहे. तो पारशिवनी येथील तकिया मारोती मंदिर परिसरात कधी कधी रुमवर राहत होता. घटनेची माहिती प्राप्त होताच पारशिवनी नगर पंचायत, तहसील कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व पोलिस प्रशासन कामाला लागले आहे. त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या लोकांची देखील तपासणी सुरू आहे. रुग्णांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविण्यात आल्याने स्थानिक प्रशासन खळबळून जागे झाले असून, पारशिवनी शहरात कोरोना व्हायरसचा रोकथाम करण्यासाठी मोठय़ाप्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहे. नगर पंचायत प्रशासना मार्फत नागरिकांना मास्क लावण्याचे तसेच सॅनिटायझरचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तकिया मारोती श्रेत्र शिल कर०यात आली व तहासिलदार वरूण सहारे,थानेदार विलास चौहान, मंडळ आधिकारी,तलाठी, तालुत्मा आरोग्य अधिकारी डाक्टर प्रशांत वाघ, व नगर प्रशासन कर्मचारी, महासुल विभागाचे, व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपास्थित होते,